आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️गोपाल गावित सर, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना
निवेदनाचे विषय- नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मंजुर होणेबाबत शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी मा.ना.बच्चुभाऊ कडू राज्यमंत्री शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, मा.जिल्हाधिकारी साो. नंदुरबार, मा.अॅड. सिमाताई पद्माकरजी वळवी अध्यक्षा जिल्हा परिषद नंदुरबार, मा.अॅड.रामभैय्या चंद्रकांतजी रघुवंशी उपाध्यक्ष जिल्हा परिषद नंदुरबार, मा.अजितदादा सुरुपसिंगजी नाईक शिक्षण सभापती, जिल्हा परिषद नंदुरबार, विकास घुगे राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांना देण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या खालील मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील मागण्या मान्य झालेल्या नाहीत. तरी प्रशासनाने सदर प्रकरणात लक्ष देवून खालीलप्रमाणे मागण्या लवकरात लवकर पूर्ण करणेस निवेदन सादर करण्यात आले आहे.
- १) शिक्षकांचे वेतन वेळेवर देण्यात यावे.
- २ ) सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे पेन्शन मंजुरीचे आदेश सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळावेत.
- ३ ) मयत शिक्षकांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी.
- ४ ) शिक्षकांची वैद्यकीय बिले वेळेवर मंजुर करण्यात यावीत.
- ५ ) शिक्षकांना चटोपाध्याय वरिष्ठ व निवडश्रेणी मंजुर करावी.
- ६ ) जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील विज्ञान विषय शिक्षकांच्या जागा भराव्यात.
- ७ ) जिल्ह्यातील अतिरिक्त समाजशास्त्र विषय शिक्षकांचे नकार मंजुर करावेत.
- ८ ) शिक्षकांना केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती देणे.
- ९ ) जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावीत.
- १०) शिक्षकांची सेवापुस्तके पडताळणी होणेबाबत तालुकास्तरावर शिबिर आयोजित करणे.
- ११ ) शिक्षकांचे ऑनलाईन उपक्रम आणि माहिती भरण्याची कामे कमी करुन ऑफलाईन अध्यापनासाठी मोकळीकता द्यावी.
- १२ ) ०१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना अंशदायी पेन्शन रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी.
- १३ ) शिक्षकांच्या गोपनिय अहवालाची गोपनिय प्रत मिळणेबाबत.
- १४ ) वैद्यकीय उपचारासाठी शिक्षकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्यात यावी.
- १५ ) २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी देण्यात यावी.
- १६ ) कोविड कर्तव्यावर असतांना कोविड -१९ ने मृत झालेल्या शिक्षकांना ५० लाखांचे विमा कवच सानुग्रह अनुदान विनाविलंब मिळावे व कोविड -१ ९ कर्तव्य बजावत असतांना संक्रमण झालेल्या शिक्षकांना विशेष रजा मिळाव्यात.
- १७ ) जी.पी.एफ. स्लिपा मिळणेबाबत.
तरी वरिल सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करणेबाबत आपल्या स्तरावरुन प्रयत्न होणेस विनंती अन्यथा प्रहार शिक्षक संघटनेमार्फत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी दिला आहे.
निवेदाची प्रत 👇👇👇

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार